वाशिष्ठी आणि शिवनदीमधून ७.६ लाख घनमीटर गाळाचा उपसा

0

चिपळूण : चिपळूणजवळील वाशिष्ठी आणि शिवनदीमधून आतापर्यंत ७ लाख ६ हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे.

गेल्यावर्षीच्या महापुराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अलोरे येथील यांत्रिकी विभागामार्फत पहिल्या टप्प्यात बहादूरशेख नाका ते पेठमाप वालोपेपर्यंतच्या भागातील गाळ उपसण्यात आला. वाशिष्ठी नदीतील शासकीय जागेतून आतापर्यंत ५ लाख १९ हजार ३८२ घनमीट र गाळ काढला गेला. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कंत्राटदारामार्फत बहादूरशेख नाका येथील बेटावरील सुमारे ३ हजार ५०० घनमीटर, तर नाम फाउंडेशन मार्फत शिवनदीमधील २ लाख ५ हजार २२२ घनमीटर इतका गाळ काढण्यात आला.

एकंदर ७ लाख ६ हजार घनमीटर गाळ काढला गेला असल्याची माहिती रत्नागिरी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here