रत्नागिरी जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदी अॅड. संदेश शहाणे यांची नियुक्ती

0

रत्नागिरी : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमानुसार रत्नागिरी जिल्हा बाल कल्याण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी अॅड. संदेश शहाणे यांची नियुक्ती राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने केली आहे.

या समितीमध्ये सदस्य म्हणून रजनी सरदेसाई, अॅड. प्रिया लोवलेकर,पत्रकार शिरीष दामले आणि डॉ. स्नेहा पिलणकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. नवी समिती जून २०२२ पासून पुढील ३ वर्षे कार्यरत राहणार आहे. काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी ही समिती काम करणार आहे.

अध्यक्ष अॅड. शहाणे रत्नागिरीतील प्रसिद्ध वकील असून ते अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेचे चिटणीस आहेत. अॅड. प्रिया लोवलेकर यांनाही सामाजिक आणि महिला,बालकांना न्याय मिळवून देणे आणि प्रबोधन,शाळांमध्ये समन्वय साधणे अशा कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यासुद्धा अधिवक्ता परिषदेच्या जिल्हा शाखेच्या उपाध्यक्ष आहेत. सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार शिरीष दामले यांनी यापूर्वी या समितीवर उत्तम काम केले आहे.
अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. भाऊ शेट्ये आणि सर्व पदाधिकारी,कार्यकारिणीने समितीचे नूतन अध्यक्ष आणि सदस्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here