नाचणे येथे उद्या रक्तदान शिबिर

0

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रक्तपेढीच्या मागणीनुसार तसेच रक्तपेढीतील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रत्नागिरीतील जीवनदान ग्रुपतर्फे येत्या गुरुवारी २६ मार्चला नाचणे येथे गोडाउन स्टॉपवरील साईमंदिरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते २ वाजेपर्यंत शिबिर होईल. शिबिराला अधिकृत परवानगी मिळाली आहे. शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आसून शासनाच्या नियमानुसार प्रत्येकाला टप्प्याटप्प्याने शिबिराच्या ठिकाणी बोलावून रक्तदान होणार आहे. या शिबिरात रक्तदान करू इच्छिणाऱ्यांनी आपले नाव, पत्ता आणि फोन नंबर असा तपशील 9146526183 किंवा 7378989878 या फोन नंबरवर पाठवावा, असे आवाहन जीवनदान ग्रुपतर्फे राजेश चंद्रकांत नार्वेकर यांनी केले आहे.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:37 AM 25-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here