गोपीनाथजी मुंडे महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण

0

मंडणगड : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक पर्यापरण दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. राहूल जाधव, एन.एस.एस. एरिया समन्वयक डॉ. भरतकुमार सोलापुरे, प्रा. विष्णू जायभाये, ग्रंथपाल दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस डॉ. भरतकुमार सोलापूरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन सदर कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. राहूल जाधव की, आज पर्यावरणविषयक जनजागृती करण्यासाठी चर्चासत्रांचे आयोजन करणे गरजेचे आहे. खरे तर वृक्षारोपणाबरोबच वृक्षसंवर्धन ही आज काळाची गरज बनली असून महाविद्यालयीन युवकांनी आपापल्या परिसरात निदान एकतरी झाड लावून पर्यावरणाचे रक्षण करावे. ‘निसर्ग वाचला तर आपण वाचू’याचा सर्वांनी विचार करुन तो कृतीत आणणे आवश्यक आहे. स्वतःपासून या राष्ट्रीय कार्याची सुरुवात करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते काजू, आंबा, कोकम, पेरु, विविध फुलझाडांची रोपे लावण्यात आली. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. विष्णू जायभाये यांनी मानले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:43 AM 11-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here