उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर आलेला यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा, कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नये, गर्दी टाळावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. देशावरचा ‘कोरोना’चा धोका पूर्णपणे संपल्यानंतरचा आनंद साजरा करण्यासाठी या गुढीपाडव्याचा उत्साह राखून ठेवावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. ’21 दिवस लॉकडाऊन’च्या घोषणेचं पालन करुन नागरिकांनी घरीच थांबावं! कोरोनाच्या संसर्गाला बळी पडू नये! संसर्ग कुटुंबियांपर्यंत नेऊ नये, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:14 AM 25-Mar-20
