देशात कोरोना विषाषूचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला 21 दिवसांसाठी लॉकडाऊन केलं जात असल्याचं घोषित केलं. या पार्श्वभूमीवर रेल्वेनेही सर्व प्रवासी आणि मालवाहतूक गाड्या 14 एप्रिलपर्यंत रद्द केल्या आहेत. भारतीय रेल्वेच्या सर्व एक्स्प्रेस, पॅसेंजर, मेल आणि मालवाहतूक गाड्या रद्द राहणार आहेत. यापूर्वी रेल्वेने 31 मार्चपर्यंत सर्व प्रवासी गाड्या रद्द करण्याची घोषणा केली होती. आता देशात लॉकडाऊन दरम्यान येत्या 14 एप्रिलपर्यंत सर्व प्रवासी आणि मालवाहतूक गाड्या रद्द केल्याची घोषणा भारतीय रेल्वेने केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:43 AM 25-Mar-20
