खेड येथील बस, रेल्वे स्थानकात व्यसनमुक्ती जनजागृती अभियान

0

खेड : येथील बसस्थानक व रेल्वे स्थानक परिसरात ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या खेड सेवा केंद्रातर्फे जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून मंगळवारी दि. ३१ रोजी व्यसनमुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात आले. खेड रेल्वे स्टेशन व बसस्थानक परिसरात मंगळवारी दि. ३१ रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या येथील सेवा केंद्रातर्फे व्यसनमुक्ती पथनाट्य सादर करण्यात आले.

यावेळी विविध प्रकारच्या व्यसनातून स्वतःला सोडवून आपले शारीरिक, आर्थिक व सामाजिक नुकसान कसे टाळता येईल, याबाबत जनजागृती करण्यात आली. या पथनाट्यात ब्रह्मकुमारी अरुणा, ब्रह्मकुमारी सीमा, ब्रह्माकुमारी सुप्रभा मुळे, सुवर्णाच कदम, सुवर्णा करावडे, वासंती महाडिक, श्रद्धा चिखले आदींनी सहभाग घेतला. खेड रेल्वे स्टेशन येथे माजी आमदार संजय कदम व रेल्वे कर्मचारी यांना ब्रह्माकुमारी गीता बहीण यांच्याहस्ते ईश्वरीय प्रसाद व भेट देण्यात आली.

यावेळी उपस्थित नागरिकांना व्यसनदान करण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत काही जणांनी आपल्याकडील तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ दान पेटीत टाकून व्यसन सोडण्याचा निर्धार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here