मुंबईतून गावात येण्यासाठी मच्छिमारी बोटींकडून तब्बल ८०,०००/- रुपये…?

0

रत्नागिरी : करोनाच्या धास्तीने बाहेरगावचे लोक गावाकडे पळ काढत आहेत. जिल्ह्यांत ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केल्याने, जिल्ह्यांच्या सीमा बंद झाल्याने आता हे लोक रस्त्याने न येता समुद्रामार्गी येत आहेत. ‘रत्नागिरी खबरदार’ला नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मच्छिमारी बोटी घेऊन गुहागरमध्ये मुंबईतून लोक गावात येत आहेत. गुहागर येथे येण्यासाठी तब्बल ८०,०००/- रुपयांमध्ये १८ लोकांना सोडण्यात आले आहे. वेळणेश्वर, बोऱ्या बंदर, कोंड कारुळ, असगोली, जयगड याठिकाणी मुंबईतून गावातील लोक बोटीने येत आहेत, तरी, संबंधिताना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजत आहे. तरी प्रशासनाने लक्ष द्यावं.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:53 PM 25-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here