जाकादेवी/वार्ताहर : रत्नागिरी तालुक्यातील आत्माराम नारायण देसाई सोमेश्वर माध्यमिक विद्यालय विल्ये- मांजरे या शाळेतील इंग्रजी व क्रीडा विषयाचे ज्येष्ठ शिक्षक प्रकाश किसन मुठाळ यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी कोल्हापूर येथे दि.१० रोजी दवाखान्यात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
प्रकाश मुठाळ हे अत्यंत प्रेमळ आणि सुस्वभावी व्यक्तिमत्त्व होते. ते विद्यार्थीप्रिय आणि समाजप्रिय शिक्षक होते. इंग्रजी व क्रीडा विषयाचे ते अध्यापक होते. विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारचे अध्यापन करून त्यांनी दहावी बोर्ड परीक्षेचे निकाल सातत्याने उंचावले होते. क्रीडाक्षेत्रातही त्यांनी आपले अनेक विद्यार्थी चमकवून शाळेचा लौकिक वाढवला. या शाळेमध्ये सुमारे ३० वर्षे त्यांनी अविरतपणे अध्यापन केले.
दिवंगत प्रकाश मुठाळ हे सर्वांशी मिळून मिसळून राहणारे होते. उपळे धुमाळा ता. बार्शी जिल्हा सोलापूर हे त्यांचे मूळ गाव होय.
त्यांच्या निधनाबद्दल विल्ये सोमेश्वर विद्यालय, शिक्षण संस्था,जाकादेवीसह तसेच संपूर्ण रत्नागिरी तालुका शिक्षण विभागातून तीव्र दुःख व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:58 PM 11-Jun-22