भारत आणि रशियामध्ये मोठा करार

0

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर प्रथमच भारत आणि रशियामध्ये मोठ्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. या दरम्यान, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि रशियन कंपनी यांच्यात करार करण्यात आला आहे.

IMG-20220514-WA0009

दिल्लीतील रशियाच्या दूतावासाने अधिकृत निवेदन जारी केले आहे.

एक मोठी रशियन कंपनी भारतातील विमानतळांसाठी लँडिंग सिस्टीम उपकरणे पुरवणार आहे. यासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि रशियन कंपनी यांच्यात करार करण्यात आला आहे. दिल्लीतील रशियाच्या दूतावासाने अधिकृत निवेदन जारी करून म्हटले आहे की, रशियन कंपनी, सायंटिफिक अँड प्रोडक्शन कॉर्पोरेशन-रेडिओ टेक्निकल सिस्टम्स ने भारतासोबत करार केला आहे. या दरम्यान, भारतातील विमानतळांसाठी ILS-734 लँडिंग सिस्टमचे 34 सेट देण्यात येणार आहे.

हे 34 रेडिओ सेट्स भारतातील 24 विविध विमानतळांवर बसवले जातील. दूतावासाच्या म्हणण्यानुसार, भारताला या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून ही उपकरणे मिळण्यास सुरुवात होईल. या कराराच्या व्यवहारांसाठी राष्ट्रीय चलन म्हणजे रुपया आणि रुबल वापरली जातील. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने देशातील 24 विविध विमानतळांच्या आधुनिकीकरणासाठी या लँडिंग उपकरणांसाठी निविदा काढल्या होत्या. ज्यामध्ये जगभरातील रेडिओ सेट बनवणाऱ्या मोठ्या जागतिक कंपन्यांनी भाग घेतला होता. मात्र ही निविदा रशियन कंपनीला मिळाली.

रशियन राजदूत काय म्हणाले?

भारतातील रशियन राजदूत डेनिस अलीपोव्ह म्हणाले की, एनपीओ-आरटीएस आणि एएआय यांच्यातील करार भारतातील जमिनीवर आधारित रेडिओ उपकरणांच्या अत्यंत स्पर्धात्मक बाजारपेठेतील रशियन व्यवसायासाठी एक प्रगती ठरला आहे. कराराच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे भारतीय विमानतळाच्या पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी संयुक्त प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी नवीन संधी उपलब्ध होतील यात शंका नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:34 PM 11-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here