आयपीएल प्रसारण हक्कांच्या शर्यतीतून ॲमेझॉनची माघार

0

क्रिकेटचा महासंग्राम असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगचे फॅन्स भारतातच नाही तर आता जगभरात वाढत आहे.

सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीग आयपीएलच्या आगामी 2023 ते 2027 पर्यंतच्या प्रसारण हक्कांसाठी सध्या बोली लावली जात असून या शर्यतीतून ॲमेझॉनने माघार घेतली आहे. रविवारी पार पडणाऱ्या या लिलाव प्रक्रियेत आता इतर चार बड्या कंपन्यात चुरशीची टक्कर सुरु असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये वायकॉम 18, सोनी, झी आणि स्टार हॉटस्टार या कंपन्या आहे. सध्या हे सर्व हक्क स्टार हॉटस्टार यांच्याकडे असून आपल्याकडीस हे डिजीटल राईट्स कायम ठेवण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. तर झी, वायकॉम 18, सोनी यांच्यातही याच्यासाठी चुरशीची शर्यत असेल.

हिंदुस्तान टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार वायकॉम 18 कोणत्याही परिस्थितीत हे आयपीएल राइट्स मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. दरम्यान ॲमेझॉनसारख्या मोठ्या कंपनीने यातून माघार घेतल्याने इतर कंपन्यांसाठी रस्ता काहीसा सोपा झाला आहे. गूगलने देखील या लिलाव प्रक्रियेत अधिक रस दाखवलेला नाही. दरम्यान या चारही कंपन्यापैकी कोणा एकाकडे हे सर्व हक्क दिले जाऊ शकतात. विशेष म्हणजे बीसीसीआयने टीव्ही आणि डिजीटल राईट्ससाठी वेगवेगळी कॅटेगरी बनवली आहे.

बीसीसीआयने टीव्ही आणि डिजीटल दोन्ही कॅटेगरीसाठी खास प्लॅन बनवला आहे. यावेळी टीव्ही कॅटेगरीतील प्रत्येक सामन्यासाठी 49 कोटी रुपयांची बेस प्राईज ठेवण्यात आली आहे. तर डिजीटल कॅटेगरीमधील प्रत्येक मॅचसाठी 33 कोटी रुपये इतकी बेस प्राईज ठेवली आहे. याशिवाय बीसीसीआयने 2027 पर्यंत सामन्यांची संख्या वाढवण्याचा प्लॅन देखील बनवला आहे. बीसीसीआय पुढील दोन वर्षांपर्यंत सामन्यांची संख्या वाढवणार नाही. 2025 आणि 2026 मध्ये बीसीसीआयकडून 74 च्या जागी 84 सामने खेळवण्याचा प्लॅन आहे. तर 2027 मध्ये बीसीसीआय 94 सामने खेळवण्याचा प्रयत्न कऱणार आहे. प्रत्येक हंगामात 74 पेक्षा कमी सामने खेळवणार नसल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:34 PM 11-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here