विहान प्रॉडक्शन्स रत्नागिरी यांची ११ रूपये ही शॉर्ट फिल्म आज ऑनलाइन प्रदर्शित केली जाणार

0

रत्नागिरीतील प्रथितयश कलाकार प्रदीप शिवगण आणि परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदीर रत्नागिरी मधील विद्यार्थीनी कु. कशिश सनगरे यांच्या या लघुपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत. या व्यतिरिक्त मानसी पाथरे, श्रेया पांचाळ व प्रशांत महाकाळ यांनी देखील या लघुपटात महत्वपूर्ण भूमिका केलेल्या आहेत. अॅड. संकेत घाग यांनी ११ रूपये ची कथा पटकथा लिहालेली असून या लघुपटाचे दिग्दर्शन ही केलेले आहे. सचिन सावंत यांनी या लघुपटाचे चित्रीकरण केलेले आहे. तर शुभम वाडकर यांनी प्रकाश याेजनेची जबाबदारी पार पाडली आहे. किशोर कनोजिया व मानसी पाथरे यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेले आहे. मिलींद गोवेकर यांनी या लघुपटाला संगीत दिलेले आहे तर ऋषिकेश जोशी यांनी या लघुपटाचे संकलन केलेले आहे. या लघुपटाचे सर्व चित्रीकरण रत्नागिरी मध्ये झालेले आहे. या फिल्म ला आजपर्यंत अनेक नामांकने पण पारितोषिके मिळालेली आहेत. ९व्या दादासाहेब फाळके फिल्म फ़ेस्टिवल दिल्ली, पिकरफ्लीक इंडी इंटरनॅशनल फ़ेस्टिवल १२ व्या फिल्मसाज फेस्टिव्हल बनारस फिल्म फेस्टिव्हल येथे या फिल्म चे अधिकृत सिलेक्शन झाले. तर कलकत्ता येथील व्हर्जिन स्प्रिंग फेस्टिव्हल येथे या फिल्म ला सिल्वर अवॉर्ड तर टागोर इंटरनॅशल फिल्म फेस्टिव्हल ला बेस्ट फिल्म क्रिटीक्स अवॉर्ड आणि कल्ट क्रीटीक मुव्ही अवॉर्ड फेस्टीव्हल मध्ये बेस्ट फिल्म चे अवॉर्ड मिळालेले आहे. तसेच गोल्डन अर्थ फिल्म अवॉर्ड फेस्टमध्ये यातील बाल कलाकार कशिश सनगरे हिला बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट चे नामांकन मिळालेले आहे.
आज कोरोना विषाणूच्या भितीदायक वातावरणात काही क्षण सर्व विसरून घरबसल्या जनतेने फ़िल्मचा आनंद उपभोगावा याचं उद्देशाने आज ही फिल्म ऑनलाईन प्रदर्शित केली जात आहे. लवकरचं फिल्म ची युट्युब लिंक प्रसिद्ध होईल.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:07 PM 25-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here