स्पेनमध्ये घरातून बाहेर पडणाऱ्यांवर आकारला जातोय पाच कोटीचा दंड

0

स्पेन: जगामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यासाठी जगभरात नानाविध उपाय सगळ्या सरकारकडून सुरु आहेत. लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतरही अनेक लोक रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत देऊनही लोक ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे अनेक सरकारनी कठोर पावले उचलली आहेत. जगात सध्या स्पेनमधील नियम अत्यंत कठोर आहेत. स्पेन १४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात घरातून विनाकारण बाहेर पडणाऱ्यांकडून मोठा आर्थिक दंड आकारण्यात येत आहे. पहिल्यांदा नियम तोडल्यास नागरिकांना दंडापोटी ६०१ युरो (तब्बल ५० हजार) मोजावे लागत आहेत. संबंधित व्यक्ती दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन करताना आढळून आली तर त्यांना तब्बल ६००००० युरोचा (पाच कोटी) दंड भरावा लागत आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत ३० हजार लोकांकडून अशाप्रकारचा दंड वसूल करण्यात आला आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here