रत्नागिरी : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये नागरी कृती दलाची स्थापना केली आहे. शहरातील वॉर्ड किंवा प्रभागाचे नगरसेवक या दलाचे अध्यक्ष असतील. नगर परिषदेतील वसुली लिपिक, स्वच्छता निरीक्षक, एएनएम किंवा आशा, पाणीपुरवठा विभागाचा कर्मचारी या दलाचे सदस्य आहेत. या दलाने दररोज आपल्या क्षेत्रातील घरांची पाहणी करून करोना विषाणूची लक्षणे असलेले रुग्ण शोधावेत आणि परदेशातून आलेल्या व्यक्ती शोधून त्यांच्या घरातील सदस्यांना सुरक्षित ठेवण्यासंबंधी आवश्यक जनजागृती करावेत, अशी अपेक्षा आहे. या कामाचा सर्व अहवाल मुख्याधिकाऱ्यांना रोजच्या रोज द्यायचा आहे.
