निलेश राणे वडिलांच्या जीवावर मोठे झाले, त्यांना स्वतःची अक्कल नाही; राष्ट्रवादीकडून पलटवार

0

मुंबई : राज्यसभेत भाजपने दिलेला अतिरिक्त उमेदवार निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र झाल्या आहेत. धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीवर भाजपकडून ताशेरे ओढले जात आहेत.

यातच भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. निलेश राणे आपल्या वडिलांच्या जीवावार मोठे झाले असून, त्यांना स्वतःची अक्कल नाही, असा पलटवार राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

राज्यसभा निवडणुकीवरून निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. अडचणीचे ढग दिसले की, अजित पवार मिस्टर इंडियासारखे गायब होतात. इतिहास सांगतो जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अजित पवार गुल. पण बरे झाले अजित पवार यात पडले नाहीत, कारण पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार राहिले नाही ते बाहेरून आमदार कुठून आणणार, असा टोला निलेश राणे यांनी लगावला होता. याला राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

निलेश राणे कोण आहेत? त्यांना आम्ही ओळखत नाही. अजित पवार दिवसरात्र काम करणारे नेते आहेत. निलेश राणे आपल्या वडिलांच्या जीवावर मोठे झालेले लोक आहेत. त्यांना स्वतःची अक्कल नाही. भाजपमध्ये ज्या बरळणाऱ्या लोकांना घेतले आहे त्यात नारायण राणेंची दोन मुले अग्रेसर आहेत, या शब्दांत विद्या चव्हाण यांनी हल्लाबोल केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:14 PM 13-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here