राजापूर नगर परिषदेच्या प्रभाग 5 मधील एक जागा अनुसुचित जाती महिलांसाठी आरक्षित

0

राजापूर : आगामी काळात होणाऱ्या राजापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी १३ जुन रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीत प्रथमच अनुसुचित जातीसाठी नगर परिषदेतील एक जागा आरक्षित झाली आहे.

आता एकुण दहा प्रभागांतील वीस जागांसाठी आगामी पंचवार्षिक निवडणूक होणार असून या वीस पैकी एक जागा ही अनुसुचित जाती जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाली आहे. अनुसुचित जातीच्या लोकसंख्या निकषाप्रमाणे प्रभाग क्र. ५ अ मधील जागा ही अनुसुचित जाती महिलांसाठी आरक्षित झाली आहे. तर उर्वरीत १९ जागांपैकी सर्व प्रभागांतील ‘अ’गटातील जागा या सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षीत झाल्या आहेत. तर ‘ब’ गटातील जागा या सर्वसाधारण जागेसाठी आरक्षीत झाल्या आहेत.
ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होणार असून शासनाच्या आदेशानुसार केवळ अनुसुचित जाती जमाती प्रवर्गासाठी लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे ही आरक्षण काढण्यात आले. अनुसुचित जातीच्या लोकसंख्येनेनुसार या प्रवर्गासाठी आरक्षण काढण्यात आले असून प्रभाग क्रमांक पाच मध्ये अनुसुचित जातीची १०५ इतकी लोकसंख्या असून हा प्रभाग या प्रवर्गासाठी आरक्षीत झाला आहे. यातून अनुसुचित जाती महिला व पुरूष यासाठी चिठ्ठीद्वारे ही आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी प्रभाग क्रमांक पाच मधील एक जागा ही अनुसुजित जाती महिला आरक्षीत झाली. त्याप्रमाणे प्रभाग क्रमांक पाच अ गटातील जागा ही अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाली. तर या प्रभागातील ब गटातील जागेचे आरक्षण सर्वसाधारण राहणार आहे.

उर्वरीत १९ प्रभागांमधील पहिल्या अ गटातील सर्व जागा या सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षीत झाल्या असून ब गटातील जागा या सर्वसाधारण राहणार आहेत.

राजापूर नगर परिषदेची नगरसेवक संख्या ही आता १७ वरून २० इतकी झाली असून आता दहा प्रभागांतून एकुण २० नगरसेवक निवडले जाणार आहेत. यामध्ये महिलांना असलेल्या ५० टक्के आरक्षणामुळे १० पुरूष व १० महिलांचा समावेश राहणार आहे. यात एक जागा ही अनुसीचित जाती जमाती महिलांची रहाणार आहे.

उपविभागीय अधिकारी प्रमोद कदम यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आलेल्या आरक्षण सोडत प्रसंगी मुख्याधिकारी प्रशांत भोसले, मुख्य लिपिक जितेंद्र जाधव आदींसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, महिला मोठया संख्येने उपस्थित होेते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:58 PM 13-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here