मारुती गणपती पिंपळपार देवस्थानच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला स्थगिती

0

रत्नागिरी : करोना व्हायरस या आलेल्या जागतिक संकटामुळे रत्नागिरी टिळक आळी येथील मारुती गणपती पिंपळपार देवस्थानच्या नूतन वास्तूचा वास्तुशांती व मूर्तींची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय विश्वस्त मंडळातर्फे घेण्यात आला आहे. सदर कार्यक्रम हा ४ एप्रिल ते ८ एप्रिल असा होता. या ओढवलेल्या जागतिक संकटाच्या निवारणानंतर पुढील कार्यक्रमाची तारीख ठरल्यानंतर सर्वांना कळविण्यात येईल, असे मारुती गणपती पिंपळपार सेवस्थानकडून कळवण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:17 PM 25-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here