ना. उदय सामंत उद्यापासून रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

0

रत्नागिरी : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार 15 जुन 2022 रोजी पहाटे 05.25 वाजता मुंबई-मडगांव कोंकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण. सकाळी 06.15 वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे आगमन व राखीव.

सकाळी 11.00 वाजता भाटये नळ पाणी पुरवठा योजना जलस्वराज्य टप्पा-२ आढावा बैठक
(स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) सकाळी 11.30 वाजता मिऱ्या, शिरगाव व अन्य ३४ गांवे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) दुपारी 12.15 वाजता मा. उप मुख्यमंत्री महोदयांचे अध्यक्षतेखाली आयोजित जैन समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात बैठकीस ऑनलाईन उपस्थिती (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) दुपारी 01.00 वाजता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम व प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत विकास कामांचा आढावा (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी)

दुपारी 02.00 वाजता प्रभाग क्र. १५ मधील नागरिकांच्या व मच्छिमारांच्या समस्यांबाबत तसेच विकास कामांबाबत बैठक. (स्थळ : श्री. उमर मुल्ला यांचे निवासस्थान, राजीवडा). दुपारी 03.00 वाजता राजीवडा, रत्नागिरी येथून मोटारीने पाली, ता. जि. रत्नागिरी कडे प्रयाण. दुपारी 03.30 वाजता कै. प्रशांत औंधकर यांचे कुटुंबियांची सांत्वनपर भेट (स्थळ : पाली, ता.जि. रत्नागिरी)

दुपारी 04.00 वाजता विधवा प्रथेचे निर्मुलनाच्या अनुषंगाने ग्रामस्थांच्या अभिनंदनपर सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : ग्रामपंचायत नाणीज, ता.जि. रत्नागिरी) सांयकाळी 05.00 वाजता पाली बसस्थानक भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ: पाली, ता. जि. रत्नागिरी). रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.

गुरुवार 16 जुन 2022 रोजी सकाळी 11.00 ते 01.00 वाजता जनता दरबार . (स्थळ : संपर्क कार्यालय, जयस्तंभ, रत्नागिरी).

दुपारी 01.15 वाजता सिटीलाईन एक्सप्रेस या अत्याधुनिक वेब-ऑफसेट मशीनच्या शुभारंभनिमित्त दै. रत्नागिरी टाईम्स कार्यालयास सदिच्छा भेट ( स्थळ: टाईम्स भवन, मारूती लाईन, रत्नागिरी )

दुपारी 01.30 वाजता पोमेंडी येथील शिवसेना प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यासमवेत बैठक (स्थळ : एम.आय.डी.सी. विश्रामगृह, रत्नागिरी). दुपारी 02.30 वाजता फणसोप येथील शिवसेना प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यासमवेत बैठक. (स्थळ : एम.आय.डी.सी. विश्रामगृह, रत्नागिरी) दुपारी 03.30 वाजता शिरगांव येथील शिवसेना प्रमुख पदाधिकारी व कार्यकत्यांसमवेत बैठक (स्थळ : एम.आय.डी.सी. विश्रामगृह, रत्नागिरी).

दुपारी 04.00 वाजता चरवेली येथील शिवसेना प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत बैठक (स्थळ : एम.आय.डी.सी. विश्रामगृह, रत्नागिरी). सांयकाळी 04.30 वाजता प्रभाग क्र. १२ (नवीन प्रभाग क्र. १३) येथील नागरिकांच्या समस्या व विकास कामांबाबत चर्चा (स्थळ: मिरकरवाडा सोसायटी, रत्नागिरी) सांयकाळी 05.30 वाजता प्रभाग क्र. १३ (नवीन प्रभाग क्र. १४) येथील नागरिकांच्या समस्या व विकास कामांबाबत चर्चा ( स्थळ : दत्त मंदिर, कुरणवाडी, रत्नागिरी)

सायंकाळी सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.

रात्रौ 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने रत्नागिरी रेल्वे स्थानक कडे प्रयाण. रात्रौ 10.50 वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मडगांव-मुंबई कॉकणकन्या एक्सप्रेसने मुंबई कडे प्रयाण

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:40 PM 14-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here