ऑलिम्पिक लांबणीवर !

0

कोरोना विषाणूचे पडसाद क्रीडाविश्वातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकवरही पडले आहेत. जीवघेण्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर टोकियो ऑलिम्पिक हा मानाचा क्रीडा महोत्सव एक वर्ष लांबणीवर गेला आहे. टोकियो ऑलिम्पिक कार्यकारी समितीतील अधिकारी हारूयुकी ताकाहाशी आणि जपान प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावमुळे अनेक देशांनी जपानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. तसेच अनेक प्रमुख खेळाडूंनी देखील सहभागी होणार नाही असे स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे जपान सरकार आणि ऑलिम्पिक समितीला अंतिम निर्णय घ्यावा लागला. टोकियो ऑलिम्पिकसाठी आयोजकांकडून आतापर्यंत 1.35 ट्रिलियन येन इतका खर्च करण्यात आला आहे. याशिवाय या स्पर्धेच्या स्पॉन्सर्सशिपसाठी निरनिराळ्या कंपन्यांसोबत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून करार करण्यात आलेला आहे. यामध्ये जपानमधील टोयोटो, ब्रिजस्टोन व पॅनासोनिक या कंपन्यांचा समावेश आहे. टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आल्याने जपानची अर्थव्यवस्था कोलमडणार हे निश्चित आहे.को रोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे टोकियो ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र यामुळे समस्या संपलेली नाही. कारण पुढल्या वर्षी फुटबॉल, बास्केटबॉलच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळवण्यात येणार आहेत. याचा अडथळा ऑलिम्पिकमध्ये येऊ शकतो.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here