७० वर्षीय वृध्दाची गळफास लावून आत्महत्या

0

देवगड : आजारपणाला कंटाळून कुवळे-तांबळवाडी येथील किसन तुकाराम दळवी (७०) या वृध्दाने घरातील लाकडी बाराला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना २३ मार्च रोजी सकाळी ११ ते १.४५ च्या सुमारास घडली. किसन हे ७ ते ८ वर्षे हृदयविकाराने आजारी होते. सोमवारी सकाळी त्यांची पत्नी सुवर्णा ही वाडीत ब्राह्मणभोजनाचा कार्यक्रम होता त्याठिकाणी गेली होती. घरी आल्यावर किसन दळवी हे घराच्या मुख्य लाकडी आडव्या बाराला काथ्याच्या दोरीने गळफास लावून लटकलेल्या स्थितीत दिसले. हे पाहून तिने मोठ्याने हंबरडा फोडला. यावेळी शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांनी धाव घेतली. घटनेची खबर प्रकाश सदाशिव लाड यांनी देवगड पोलिसात दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून अधिक तपास पोलिस हवालदार टी.आर.पडवळ करीत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here