रत्नागिरीत जागतिक योगदिन साजरा होणार

0

रत्नागिरी : दि. २१ जून २०२२ रोजी सकाळी ६ ते ७.३० राधाकृष्ण मंदिर, रत्नागिरी येथे जागतिक योगदिन साजरा होणार आहे.

आयुष्यात सर्वात खरी संपत्ती जर कोणती असेल तर ती म्हणजे आपले उत्तम आरोग्य. स्वभावाला सुंदर औषध तर योग च आहे. तेव्हा खरच आपण आवर्जून उशीर होण्या पूर्वी येवून अनुभव घ्या.

राधाकृष्ण मंदिरात गेले तीन वर्षे श्रीकांत ढालकर गुरुजी यांचे मार्गदर्शना खाली योग वर्ग चालू आहेत त्यांचे अनेक योग साधक हे यशस्वी योगशिक्षक झाले आहेत त्यातील काही योग साधक यानी योगा मधील अधिक काही परिक्षा देऊन स्वतःचे वर्ग सुरू केले आहेत.

या कार्यक्रमात राधाकृष्ण योग साधकांची आसने प्रात्यक्षिके सादर होणार आहेत. तसेच ज्यांनी या योगवर्गाला विशेष प्रोत्साहन दिले असे श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था रत्नागिरी चे अध्यक्ष मा.श्री. राजनजी मलुष्टे हे उपस्थित राहाणार आहेत. विशेष पाहुणे म्हणून डॉ. निधी पटवर्धन हरहुन्नरी अष्टपैलु व्यक्तिमत्व यांची उपस्थिती लाभणार असून त्यांचे अनुभवी बोल आणि योग गुरु श्रीकांत ढालकर यांचे योग प्रबोधन होणार आहे.

या कार्यक्रमासाठी राधाकृष्ण योग साधक मेहनत घेत आहेतच. आणि योग शिक्षिका केतकी जोशी, पूजा जोशी व प्रियांका एकावडे या साधकांची विशेष तयारी करून घेत आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:57 AM 15-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here