राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 116 वर पोहचली

0

सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या कुटुंबातील चौघांना आधीच कोरोना झाला होता. त्यानंतर कुटुंबातील आणखी पाच सदस्यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. तर त्यात अजून मुंबईतील चौघांची भर पडून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ११६ झाली आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील 4 कोरोनाच्या संशयीत रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. याच कुटुंबातील आणखी 5 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 2 पुरुष, 2 स्त्रिया आणि एका लहान मुलीचा समावेश असल्यामुळे सांगलीतील आता कोरोना रुग्णांची संख्या 4 वरून 9 झाली आहे. दुसरीकडे मुंबईत देखील आज चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. सांगलीमध्ये समोर आलेल्या अहवालानंतर ते रुग्ण कुणाच्या संपर्कात होते याची तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर पुढे घ्यावयाची खबरदारी प्रशासन पूर्णत: घेत आहे. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे यांनी कुणीही घाबरून जावू नये, असे आवाहन केले आहे. एकीकडे सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत जात असताना नागरिक मात्र पुरेशी खबरदारी घेतांना दिसत नाहीत. इस्लामपूर शहरातील काही ठिकाणी पोलिसांच्या पुढाकाराने अत्यावश्यक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवून नागरिक खरेदी करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:41 PM 25-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here