लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

0

दापोली : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दापोलीत वृद्धाला लुटणाऱ्याला बेडया ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. भावेश अनंत वाळणकर (३७ रा. करंजाडी सुतारकोड ता.महाड, जि.रायगड) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याच नाव आहे. संबंधित चोरट्याने महाडिक यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावत पोबारा केला होता.

दापोली तालुक्यातील पालगड येथे २० मे रोजी नारायण कृष्णा महाडीक (७५ वर्षे व्यवसाय रा. पालगड, ता. दापोली) हे सकाळी पालगड येथुन त्यांच्या भाचीला भेटण्यासाठी आसुद येथे निघाले होते. दापोली एसटी स्टँड येथे येवुन आसुदकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत होते. यावेळी संशयित दुचाकीवरून आलेल्या स्वाराने मी तुम्हाला आसुदला सोडतो असे सांगितले. त्याच्या गाडीवरून महाडीक याना आसुद गणेशवाडी दापोली स्टॉपचे पासून सुमारे २०० मिटर अंतरावर निर्जन ठिकाणी नेले. यावेळी मित्राचे घरी वस्तु द्यावयाची आहे असे सांगून फोन करतो असे सांगितले. तुम्ही येथे बाकावरती बसा असे म्हणुन फोन करण्याचा बहाणाने महाडीक यांचे जवळ येवुन तुमचे डोक्यावर, मानेवर मुंग्या आहेत असे बोलून फिर्यादीचे शर्टाची कॉलर झटकुन त्याचे गळ्यातील २५००० रु किमतीची ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरीने खेचुन पळून गेला. महाडीक हे वयोवृध्द असल्यामुळे त्यांनी प्रतिकार केला नाही. याबाबतची फिर्याद त्यांनी दापोली पोलिस स्थानिकात दिली. तेव्हापासून आरोपीचा शोध घेण्यात येत होता.

सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास वरिष्ठांच्या आदेशाने पोउनि पड्याळ यांनी केला होता. गुन्ह्याचे तपासकामी एसटी स्टैन्ड परीसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीत याचा चेहरा व मोटारसायकल दिसुन येत होती. सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र प्रसारीत करण्यात आली. तरीही चोरट्याचा शोध लागत नव्हता.

त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकानी ७ जुन रोजी दिलेल्या आदेशानुसार या गुन्ह्याचा तपास पोनि विवेक अहिरे यांनी स्वतःकडे घेतला. अहिर यांनी पोउनि पड्याळ, पोना . कांबळे , पो. कॉन्स्टेबल पवार, पो कॉन्स्टेबल सातार्डेकर यांचे तपास पथक तयार केले. त्यांना तपासकामी योग्य त्या सुचना दिल्या. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेज चेक करुन मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे चोरट्याचा शोध घेण्यात येत होता. १४ जुन रोजी करंजाडी ता.महाड येथे चोरटा असल्याचे समजले. पोलिसांनी त्या ठिकाणी जावुन सापळा रचला. या सापळ्यात चोरटा अलगद सापडला. त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ४०,००० / – रु किमतीची काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आलेली आहे. भावेश अनंत वाळणकर (३७ रा . करंजाडी सुतारकोड ता.महाड, जि.रायगड) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याच नाव आहे.

या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी खेड यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोनि विवेक अहिरे यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि विलास पड्याळ, पोना. कारंडे, पोकों पवार, पोकों सातार्डेकर, पोकों मोहिते, चापोना देसाई यांनी प्रयत्न केलेले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:30 PM 15-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here