आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार

0

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ लवकरच आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 19 जून रोजी संपल्यानंतर 26 जूनपासून आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी20 मालिका खेळेल. दरम्यान या मालिकेसाठी नुकतीच संघाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी यंदाच्या आयपीएल विजेत्या गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला कर्णधार करण्यात आलं आहे. तर भुवनेश्वर कुमार उपकर्णधार असणार आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या राहुल त्रिपाठीलाही अखेर भारतीय संघात एन्ट्री मिळाली आहे.

याशिवाय सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन याचंही संघात पुनरागमन झालं आहे. बीसीसीआयने ट्वीट करत संघाची घोषणा केली आहे.

आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ

हार्दिक पांड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक

भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यांचे वेळापत्रक

सामनादिनांक ठिकाण
पहिला टी20 सामना26 जूनडबलिन क्रिकेट स्टेडियम, मलाहाइड, आयर्लंड 
दुसरा टी20 सामना28 जूनडबलिन क्रिकेट स्टेडियम, मलाहाइड, आयर्लंड 

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:59 PM 16-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here