पाली बसस्थानक पुनर्बांधणी कामाचा भूमीपूजन सोहळा ना. उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न

0

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या सर्वसाधारण योजनेअंतर्गत राज्य परिवहन, रत्नागिरी विभागातील पाली बसस्थानकाची पुनर्बांधणी करणे या कामाचा भूमीपूजन सोहळा ना. श्री. उदय सामंत, मंत्री (उच्च व तंत्रशिक्षण), महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सिंधुदुर्ग यांचे हस्ते बुधवार दि. १५.०६.२०२२ रोजी सायंकाळी ०५.०० वा संपन्न झाला.

सदर योजनेसाठी ना. श्री. अनिल परब, रा प महामंडळाचे अध्यक्ष तथा मंत्री परिवहन खाते, महाराष्ट्र राज्य यांनी तातडीने मंजूरी दिली. तसेच, ना. श्री. उदय सामंत, मंत्री (उच्च व तंत्रशिक्षण), महाराष्ट्र राज्य व रा प महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा.श्री.शेखर चन्ने (भाप्रसे) यांचे मार्गदर्शनाखाली प्रस्तूत योजना अमंलात आली आहे.

सदर कार्यक्रमावेळी श्री. बाबु म्हाप जिल्हा परिषद सदस्य रत्नागिरी, श्री. महाडीक उपजिल्हाप्रमुख रत्नागिरी, श्री. डॉ. सुर्यवंशी प्रांत अधिकारी, श्री.परशुराम कदम, श्री. गजानन पाटील, श्री. प्रज्ञेश बोरसे विभाग नियंत्रक रा प रत्नागिरी, श्री. प्रमोद जगताप यंत्र अभियंता (चालन), श्री.अनिल म्हेत्तर विभागीय वाहतूक अधिकारी, श्री संदिप पाटील आगार व्यवस्थापक रा प लांजा आगार आदी मान्यवर उपस्थित होते.

मंजूर निधी : ०३ कोटी २१ लाख

तसेच, पाली येथे नव्याने बांधण्यात येणा-या बसस्थानकावर उभारण्यात येणा-या प्रवासी सुविधा :

०६ फलाट, प्रवासी विश्रांतीगृह, पार्सल सुविधा, पाण्याची टाकी, वाणिज्य आस्थापना, सी.सी.टी.व्ही.सुविधा, आरक्षण कक्ष विदयार्थी पास सुविधा, वाहतूक नियंत्रक कक्ष, हिरकणी कक्ष, प्रसाधनगृह, उपहारगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दुचाकी व चारचाकी वाहनतळ उपलब्ध असेल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:14 PM 16-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here