कोणत्याही क्षेत्रात पुढं जायचं असेल तर विज्ञानाची साथ गरजेची : शरद पवार

0

पुणे : जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात पुढं जायचं असेल तर विज्ञानाची साथ घेतली पाहिजे. माणूस चंद्रावर जातोय, हा बदल विज्ञानामुळेच होऊ शकल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.

बारामतीतील हा प्रकल्प पाहिल्यानंतर तुम्हाला विज्ञानाची आवड निर्माण होईल असेही पवार म्हणाले. आपणा सर्वांची वैज्ञनिक दृष्टी वाढावी, विज्ञानाच्या आधारे विचार करण्याची मानसिकता वाढावी यासाठी हा प्रकल्प दिशा देईल असेही पवार म्हणाले. आज बारामतीत सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी बारामतीत आले होते. या कार्यक्रमात पवार बोलत होते.

माणूस आता चंद्रावर, मंगळावर जात आहे. हा प्रचंड मोठा बदल आहे. हे सगळं विज्ञानामुलं शक्य झाल्याचे पवार यावेळी म्हणाले. आपणा सगळ्यांची वैज्ञनिक दृष्टी वाढावी, विज्ञानाच्या आधारे विचार करण्याची मानसिकता तयार होणं गरजेच आहे. विज्ञानाच्या सहायाने यश कसे मिळवायचे याची माहिची होणं गरजेचं असल्याचे पवार म्हणाले. यासाठी हे केंद्र मार्गदर्शन करेल, हा प्रकल्प पाहिल्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढेल. विज्ञानाच्या संबंधीचे आकर्षण वाढेल असेही पवार म्हणाले.

राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन, महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमासाठी गौतम अदानी आले होते. तसेच या उद्घाटनासाठी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. बारामतीतील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात हे सायन्स पार्क उभारण्यात आले आहे. राज्यभरात सध्या चर्चिला जात असलेल्या या सायन्स पार्कमध्ये मुलांच्या बौद्धिक कौशल्य व वैज्ञानिक जागृती वाढीसाठी वेगवेगळे प्रकल्प असणार आहेत. या माध्यमातून शालेय दशेपासूनच विद्यार्थी स्वतंत्रपणे जगातील प्रत्येक कुतूहल असणाऱ्या गोष्टीविषयी आपल्या वेगळ्या सिद्धांताची मांडणी करु शकतील. तसेच त्यांच्यात लहानपणीच वैज्ञानिक वृत्ती वाढीस लागणार असल्याची माहिती राजेंद्र पवार यांनी दिली. या सायन्स पार्कच्या उद्घाटनाच्या निमित्ताने दोन दिवसीय राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा आज समारोप होणार आहे.

भविष्यात विद्यार्थ्यांना या केंद्रात उपलब्ध असणाऱ्या फन सायन्स गॅलरी, अॅग्रीकल्चरल गॅलरी, 3डी थिएटर, इनोव्हेशन हब, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंतेड रीलिटी अशा स्वरुपाचे तंत्रज्ञान येथे पाहायला मिळेल. जपान, कोरिया आणि चीन या देशांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण व्यवस्था आहे. त्यामुळं तेथील तरुण संशोधक टेलिकॉम, ऑटोमोबाईल, होम अप्लायन्सेस या क्षेत्रात भरीव प्रगती करत आहेत. याचमुळं कोडींग डेटा सायन्स डिजिटल मार्केटिंग डिझाईन थिंकिंग या तंत्रज्ञानाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण या सेंटरमध्ये देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:14 PM 16-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here