दहावी, बारावीचे पेपर घरी तपासले जाणार

0

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या मूल्यमापनाचे काम आता शिक्षकांना घरी बसून करता येणार आहेत. राज्य मंडळाने याबाबत सर्व विभागीय मंडळांना सूचना दिल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाचे काम शिक्षकांना घरी बसून करता यावे,यासंदर्भात राज्य शासनाने राज्य मंडळाला आदेश द्यावेत, असे निवेदन महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले होते. दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका होलो क्राफ्ट स्टीकर व बारकोड असल्याने कोणत्याही गोपनीयतेचा भंग होणार नाही. त्यामुळे शिक्षकांना उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनासाठी ‘वर्क फ्रॉम होम’ चा आदेश निर्गमित करावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले होते. राज्य शासनाने शिक्षक महासंघाची मागणी नुकतीच मान्य केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here