रत्नागिरीतील नागरिकांना प्रशासनाकडून देण्यात आलेली माहिती

0

१) मा. प्रधानमंत्री यांच्या आदेशान्वये देशासह जिल्हयात सर्वत्र 14 एप्रिल 2020 पर्यंत आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये लॉकडाऊन झाले असून याची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात आली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

२) जिल्हयातील ज्या कंपन्याच्या आस्थापना पूर्णपणे बंद आहेत, त्या कंपन्यामध्ये फक्त सुरक्षा, विद्युत व देखभालीसाठी कर्मचारी ठेवण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. परंतु सदर कर्मचारी कंपनी आवारात राहतील इतरत्र कोठे जाणार या अटीच्या आधीन राहून वरील मुभा देण्यात आली आहे .

३) अत्यावश्यक वाहनांना पास देण्याबाबत निर्णय घेण्यात येत असून पुढील एक दोन दिवसात जिल्हयातील प्रत्येक तहसिल कार्यालयांतून अत्यावश्यक वाहनांना पास देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल .

४) येथून कोरोना तपासणीसाठी 34 नमुने पाठविण्यात आले होते. 2 रिजेक्ट झाले. 10 नमुने निकाल बाकी आहेत. 21 प्रकरणी अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.

५) येथील जिल्हा रुग्णालयात 5 व्हेंटीलेटर्स आहेत.कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात 4 आणि कामथे उपजिल्हा रुग्णालयात 1 असे एकूण 10 व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत.

६) जिल्हयात सिव्हील हॉस्पीटल येथे 11 जण निगराणीखाली आहेत. तर 639 जणांना होम कॉरंटाईन करण्यात आले आहे.

७) जीवनावश्यक वस्तू लोकांना होम डिलीव्हरी द्वारे देण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेऊन प्रशासनास सहकार्य केले आहे. स्वंयसेवी संस्था व संघटना यासाठी पुढे आल्या असून त्यांना नियोजनबध्दरित्या काम आखून दिले जाणार आहे.

८) या 21 दिवसांच्या कालावधीत खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरु ठेवून नेहमीप्रमाणे रुग्णांची तपासणी सुरु ठेवावी असे आदेश जारी करण्यात आले आहेत.

९) पुण्या-मुंबईहून 08 मार्च 2020 पासून नंतरच्या काळात रत्नागिरी जिल्हयात आलेल्या नागरिकांनी सक्तीने स्वत:च्या घरात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचा भंग करण्यांवर दंडणीय कारवाई करण्यात येणार आहे.

१०) धान्य दुकानदारांनी अधिकचा साठा ठेवून साठबाजी करु नये तसेच धान्य साठयाबाबत दुकानाच्या दर्शन फलक लावणे सक्तीचे करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

११) जिल्हयात 144 अंतर्गत 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

१२) रत्नागिरीतील स्वयंसेवी संस्थांची आज जिल्हाधिकारी महोदयासोबत बैठक झाली. सदर बैठकीत झालेल्या निर्णयानुसर स्वयंसेवी संस्था अत्यावश्यक अन्नधान्य, भाजीपाला, औषधे इ. सामान नागरिकापर्यंत घरपोच करणार असून फक्त सदरचे दुकान हे त्या नागरिकांच्या घरापासून नजिकचे असणे गरजे आहे.

१३) पुणे, पिंपरी चिंचवड तसेच मुंबई येथून आलेल्या व्यक्ती तसेच त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्ती याची माहिती यंत्रणा ट्रॅक करीत आहे.

१४) होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
08:28 PM 25/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here