सुश्रुत तेंडुलकरचे डीएनबी जनरल सर्जरी परीक्षेत यश

0

रत्नागिरी : लांज्यातील सुश्रुत प्रमोद तेंडुलकर याने दिल्लीच्या नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसतर्फे घेण्यात आलेल्या डीएनबी इन जनरल सर्जरीच्या अंतिम परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवले. ही परीक्षा मे महिन्यात घेण्यात आली होती.

HTML tutorial

सुश्रुतचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल (लांजा) येथे आणि बारावीचे शिक्षण र. ए. सोसायटीच्या अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात झाले आहे. सुश्रुतच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

सुश्रुतने 2018 मध्ये एमबीबीएस पदवी तेरणा मेडिकल कॉलेज नेरूळ येथून संपादन केली. तसेच 2019 मध्ये डीएनबी जनरल सर्जरीला गिरगाव, मुंबईच्या रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये प्रवेश घेतला. या संस्थेतून तीन वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स विशेष प्रवीण्याने पूर्ण केला. अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया त्याने तज्ज्ञ डॉक्टरांच्या हाताखाली शिकून घेतलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here