डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्रीस बंदी

0

रत्नागिरी : करोना प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे की, किरकोळ तसेच घाऊक औषध विक्रेत्यांनी रुग्णसेवा देत असताना स्वत:ची आणि आपल्या दुकानातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची पुरेशी काळजी घ्यावी. तसेच मास्क आणि सॅनिटायझरची विक्री योग्य त्या छापील दरातच करावी. मास्कसाठी दर्जानुसार ८ रुपये, १० रुपये आणि २०० मिलि सॅनिटायझरची किंमत १०० रुपये या प्रमाणित किमतीपेक्षा अधिक किमतीला विकू नयेत. सध्या टीव्ही अथवा समाजमाध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्यांच्या अनुषंगाने काही लोक भीतीपोटी गरज नसताना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय Azithromycin, Hydroxychloroquine, Antiretroviral (Antiviral), Antibiotic अशा काही औषधांची खरेदी करत आहेत. अशा अनावश्यक औषधांची खरेदी करण्यासाठी गर्दी होत असून या औषधांची विक्री विनाचिठ्ठी आणि अनावश्यक प्रमाणात केल्याने बाजारात विनाकारण औषधांची टंचाई निर्माण होऊ शकते. तसेच ती औषधे गरजूंना वेळेत न मिळण्याची शक्यताही आहे. त्यामुळे अधिकृत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणत्याही परिस्थितीत शेड्यूल एच, एच १, शेड्यूल एक्समधील औषधांची किरकोळ विक्री करू नये, असे सांगण्यात आले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here