अनैसर्गिक कचरा टाकताना आढळल्यास कडक कारवाई करणार; हनुमाननगर वसाहत मंडळाचा इशारा

0

रत्नागिरी : मिरजोळ येथील हनुमाननगर येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या कडेचा परिसर येथे हनुमान नगर परिसरात रहाणारे रहिवासी घरातील कचरा आणुन टाकत आहेत. नुसता कचराच नाही तर दारुच्या बाटल्या, डायपर्स, सॅनिटरी पॅड घरातले जुने कपडे, आणी अंथरुणासारख्या जुन्या वापरातील साहित्यही येथे उघड्यावर टाकत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका आहे. येथील सुजाण वरिष्ठ नागरीक मोहन खानविलकर आणि मनोहर मेस्री यांनी हा कचरा एकत्र करुन जळून टाकला. त्याची विल्हेवाट लावली. तसेच हा परिसरही स्वच्छ केला. त्यांनी केलेल्या या सेवाभावी कामांचे परिसरात कौतक होत आहे.

मात्र, यापुढे असा कोणताही अनैसर्गिक कचरा टाकताना आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मिरजोळे हनुमाननगर वसाहत मंडळाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here