नवी मुंबई – राज्यातील करोनाचे संकट अधिकाधिक गंभीर होत चालले आहे. एकीकडे करोनाबाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढत असताना मृतांचा आकडाही हळुहळू वाढू लागला आहे. वाशी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ६५ वर्षीय एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते.
