एसटी कर्मचाऱ्यांनी पोलिसांना मदतीसाठी हात देण्याची दर्शवली तयारी

0

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे. मात्र तरीही अनेक लोक घराबाहेर पडत असल्याने बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर ताण येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या मदतीसाठी पुढे येण्याची तयारी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दर्शवली आहे. संचारबंदीदरम्यान बंदोबस्तासाठी आवश्यकता भासल्यास एसटी महामंडळाचे कर्मचारी सज्ज असल्याचे सांगत एका एसटी कर्मचाऱ्याने राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना पत्र लिहिले आहे. संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी मनुष्यबळाची आवश्यकता पडल्यास एसटी महामंडळाच्या चालक, वाहक, यांत्रिक, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्राची तसेच देशाची सेवा करण्यासाठी आम्हाला संधी देण्यात यावी, अशी कळकळीची विनंती सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मा. परिवहनमंत्री साहेबांना करतो, असे या पत्रात म्हटले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here