जिल्ह्यात आजपासून मान्सून सक्रीय होण्याची शक्यता..

0

रत्नागिरी : गेले अनेक दिवस प्रतीक्षेत असलेला पाऊस जिल्ह्यात शुक्रवारी संथ गतीने सक्रिय झाला. सकाळी हलका शिडकाव्याने सुरू झालेल्या पावसाने दिवसभर मळभी वातवरणाबरोबर ऊनपावसाचा खेळ सुरू ठेवला. दरम्यान, जिल्ह्यात शनिवारपासून मान्सून सक्रिय होणार आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कुलाबा वेधशाळेने दिलेल्या संदेशानुसार कोकणात ‘मान्सून अलर्ट जारी करण्यात आला आहे तर तळ कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला
आहे.

शुक्रवारी संपलेल्या २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात ९.८९ मि.मी.च्या सरासरीने ८९ मि.मी. एकूण पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने शतकी सरासरी गाठताना एक हजार मि.मी.चा टप्पा पूर्ण केला आहे.

जिल्ह्यात पूर्वमोसमीने दमदार आगमन केल्यानंतर कोकणात मोसमी पावसाची प्रतीक्षा सुरू झाली होती. गेले अनेक दिवस पाऊस हुलकावणी देत होता. मोसमी पावसाला विलंब होत असल्याने शेतकरीही चिंतातूर झाला होता. अनेक भागात पेरण्यांची लगबग सुरू असताना पाऊस सहकार्य करीत नसल्याने बेगमीची अनेक कामे खोळंबली होती.

शुक्रवारी पावसाने संथगतीने रत्नागिरी जिल्ह्यासह उर्वरित कोकणातही सुरुवात केली असताना आता कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार शनिवारपासून मान्सून सक्रिय होणार असल्याचा नवा अंदाज वर्तविला आहे.

सुरुवातालीचा जोशात येणाऱ्या पावसामुळे तळ कोकणात ‘ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोकणात मान्सून अलर्ट जारी करताना सागरी किनारी गावांसह दुर्गम भागातील नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

दरम्यान, शुक्रवारी रत्नागिरी तालुक्यात गुरूवार प्रमाणेच जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी तालुक्यात ३३ मि.मी. अशी सर्वाधिक पावसाची नोंद झाली. मंडणगड आणि दापोली तालुक्यात प्रत्येकी २, गुहागर आणि चिपळूणमध्ये प्रत्येकी १२, लांजा तालुक्यात १५ आणि खेड तालुक्यात ७मि. मी. पावसाची नोंद झाली. संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात अनुक्रमे १ आणि ५ मि. मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात दिवसभरात ८९ मि.मी. एकूण पाऊस झाला तर आतापर्यंत पावसाने सासरीची शंभरी पार केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:16 AM 18-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here