राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या अर्जाला मुदतवाढ

0

मुंबई : एमपीएससीने पदभरती परीक्षेसाठी कमाल संधीची मर्यादा रद्द केलीय. त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी अर्ज सादर करण्यास 24 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएसी) शुक्रवारी यांसदर्भात परिपत्रक जारी केले आहे.

यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीने 2 वर्षांपूर्वी पदभरती परीक्षांसाठी कमाल संधींची मर्यादा लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही दिवसांपूर्वी या निर्णयात फेरबदल करून प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याबाबतचा निर्णय लागू करण्यात आला. परंतु, एमपीएससीच्या कमाल संधी मर्यादेच्या नियमामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 साठी काही उमेदवारांना अर्ज सादर करता नव्हता. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करता येण्याच्या दृष्टीने अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला.

त्यानुसार आता उमेदवारांना 24 जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून शुल्क भरता येईल, असे एमपीएससीतर्फे स्पष्ट करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:58 AM 18-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here