क्रांतीनगर येथील तलवार हल्ल्यातील संशयितांच्या कोठडीत वाढ

0

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी क्रांतीनगर येथे राजेंद्र शिवाजी विटकर (२८, रा. क्रांतिनगर, रत्नागिरी) या तरुणावर धारदार तलवारीने वार करणाऱ्या दोन संशयिताच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने शुक्रवारी ५ दिवसांची वाढ केली. तसेच त्यांना पळून जाण्यास आणि आपल्या घरी आश्रय देणाऱ्या संशयिताची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

गुरुनाथ प्रताप नाचणकर (२६, रा.मिरजोळे, रत्नागिरी), सुशिल सुनील रहाटे (३३, रा.लक्ष्मी नगर कोळंबे, रत्नागिरी) अशी पोलिस कोठडी वाढ करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर सौरभ अर्जुन सावंत (३२, रा. सुपलवाडी
नाचणे, रत्नागिरी) याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

६ जून रोजी दुपारी राजेंद्रचा गुरुनाथ नाचणकर आणि सुशिल रहाटेशी वाद झाला होता. या रागातून रात्री ८.२० वा. या दोघांनी राजेंद्रवर धारदार तलवरीने वार करुन त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

मंगळवारी न्यायालयाने या तिघांनाही १७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांच्या पोलिस कोठडीत वाढ करून एकाला न्यायालयीन कोठडी सुनावली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:01 AM 18-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here