कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला लॉकडाउनचा निर्णय योग्यच आहे. मात्र या कालावधीत हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी विविध पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे, असं अर्थमंत्री यांनी स्पष्ट केले आहे. देशातील गोरगरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आहे. तसेच, वर्कर, नर्सेस आणि आरोग्य विभागात काम करणाऱ्यांना 50 लाखांचा विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:10 PM 26-Mar-20
