देवरूख : लॉकडाऊनच्या काळात देवरूख शहरात अत्यावश्यक सेवा वगळता बाकी व्यवहार ठप्प आहेत. नागरिक मात्र भाजीपाला व किराणा घेण्यासाठी बाजारात गर्दी करताना दिसत होते. पाचपेक्षा जास्त नागरिक एकत्र येऊ नयेत यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, भाजी व्यापारी बाळासाहेब ढवळे यांनी भाजी दुकानासमोर योग्य अंतर ठेऊन चौकोन आखले व नागरिकांनी रांगेत या चौकोनात येऊन भाजी खरेदी करावी, असे आवाहन नागरिकांना केले. आरोग्याच्या काळजीसाठी नागरिकांनी हा फंडा स्वीकारला व गर्दी न करता भाजी विक्री सुरळीत सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.
