ज्येष्ठ नागरिक समूह मेर्वी तर्फे मेर्वी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण

0

गावखडी/ बातमीदार : रत्नागिरी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक समूह मेर्वी यांच्यावतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेतील विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प आणि पेन देऊन भव्य स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे कोरोना कालावधीत सुध्दा अतिशय उत्तम अध्यापनाचे कार्य करणारे मेर्वी शाळेतील शिक्षकवृंद यांचा सन्मान ज्येष्ठ नागरिक समूह मेर्वी तर्फे व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी मेर्वी शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष कडवईकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश म्हादये, उपाध्यक्ष प्रिती मेस्त्री, सरपंच शशिकांत म्हादये, ज्येष्ठ नागरिक समूह मेर्वीचे अध्यक्ष आणि माजी पोलीस पाटील सुरेश खरडे, एकनाथ गोठणकर, दत्ताराम कुरतडकर, वासुदेव गुरव, मारूती खरडे, सखाराम गुरव, वामन मेस्त्री, सखाराम गुरव, उपशिक्षक शंकर वरक, चंद्रशेखर पेटकर, अनिता जाधव, स्नेहल कांबळे, अंगणवाडी शिक्षिका सुनिता मेस्त्री, आकांक्षा गुरव ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.

प्रास्ताविकात उपस्थित मान्यवरांचा परिचय व कार्यक्रमाचा हेतू उपशिक्षक शंकर वरक यांनी विशद केला आणि मेर्वी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री.संतोष कडवईकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे सुद्धा स्वागत प्रवेशोतसव साजरा करण्यात आला. आणि मोफत पाठ्यपुस्तकांचे विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांचे हस्ते वितरण करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिक समूह मेर्वी यांच्यावतीने अध्यक्ष सुरेश खरडे, एकनाथ गोठणकर, मंडळाचे सर्व पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश म्हादये, सरपंच शशिकांत म्हादये आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बुंदीचे लाडू वाटप करून नवीन शैक्षणिक वर्षाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:41 PM 20-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here