स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव वृद्धी मासा चा दणक्यात प्रारंभ, पहिल्या दिवशी 1 कोटी 3 लाखांच्या नव्या ठेवी : अँड. दीपक पटवर्धन

0

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पत संस्थेचा ठेव वृद्धी मास उत्सवाची आज दणक्यात सुरुवात झाली.

संस्थेच्या शाखांमध्ये ठेवीदारांनी भरभरून ठेवी जमा केल्या. 1 कोटी 3 लाखांच्या नव्या ठेवी जमा झाल्या. प्रारंभाच्या दिवशी 1 कोटी चे संकलन संस्थेच्या ठेववृद्धी मासाबाबत जनतेमध्ये किती लोकप्रियता आहे याचे निदर्शक आहे. या प्रचंड प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे, संस्थेची विश्वासार्ह प्रतिमा या प्रतिसादाने अधोरेखित होते, अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष अँड दीपक पटवर्धन यांनी दिली.

या ठेववृद्धी मासात संस्थेच्या विश्वासार्ह ठेव योजनेत आपली अमूल्य ठेव गुंतवून ठेवीदारांनी सुरक्षित गुंतवणुकीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अँड दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:25 PM 20-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here