महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार..?

0

मुंबई : महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर आता आणखी एक मोठी घडामोड व्हायची शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार का?असा प्रश्न उपस्थित होत आहे. संध्याकाळपर्यंत याबाबत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या सूरतमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 29 आमदार आहेत. हे आमदार आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देणार नाही, असं पत्र राज्यपालांना देऊ शकतात.

या पत्रात शिवसेनेचं नाव घेतलं जाणार नाही, असंही सांगण्यात येत आहे. दुसरीकडे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठकीला उपस्थित असलेले 7 आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. काल महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच एकनाथ शिंदे आणि काही आमदार मुंबईहून सूरतच्या दिशेने रवाना झाले.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत 29 आमदार असतील, तर राज्यातलं महाविकासआघाडी सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर सूरतच्या दिशेने रवाना झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले, सचिन आहिर आणि आमशा पाडवी यांना प्रत्येकी 26-26 मतं पडली. शिवसेनेची स्वत:ची संख्या 55 आणि सहकारी आमदारांची मिळून संख्या 64 आहे, म्हणजेच शिवसेना आणि सहकारी पक्षांचे मिळून 12 आमदार फुटल्याचं काल निकाल लागल्यानंतरच स्पष्ट झालं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:30 PM 21-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here