दहावी-बारावीच्या निकालावरही करोनाचे सावट

0

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता देशभरात लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्याने सगळ्यांनाच वर्क फ्रॉम होमचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. अशात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडूनही शिक्षकांना दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका घरी तपासण्याचे निर्देश अटी शर्ती घालून देण्यात आले आहेत. मात्र आधीच दहावीच्या भूगोलाचा पेपरला स्थगिती अजून त्यात संचारबंदी आणि त्यात लॉकडाऊन लागू झाल्याने 10 वी च्या जवळपास लाखो उत्तरपत्रिका या शाळेमध्ये अडकून पडल्या आहेत. शिक्षकांना पेपर कलेक्शनसाठी पर्यायच उपलब्ध राहिला नाही, त्यात आधीच काही शिक्षक गावी पोहचले आहेत. या परिस्थितीत जोपर्यंत संचार बंदी उठून शिक्षक हे पेपर्स येऊन गोळा करणार नाहीत व तोपर्यंत निकाल लागणे शक्य नाही. त्यामुळे निश्चितच यंदा दहावी-बारावीच्या निकालाना लेटमार्क लागणार असल्याचे निश्चित झाले आहे. नियमानुसार दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करणे अपेक्षित असते मात्र आता शिक्षकांना पेपर तपासण्यासाठी विलंब होणार असून शिक्षकांनी हे पेपर तपासल्यानंतर नियामककडे (मॉडरेटर) जातात आणि त्यानंतर गुणपत्रक तयार केले जातात. मग निकाल लागतो अशी प्रक्रिया असल्याने निकालाला लेटमार्क लागणे निश्चित असल्याचे दिसत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here