रत्नागिरीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

0

रत्नागिरी : आरोग्य विभाग, जिल्हा प्रशीक्षण केंद्र उद्यमनगर, रत्नागिरी येथील सभागृहात मंगळवारी सकाळी 7 वाजता योग महोत्सव निमित्त 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी श्री. परिक्षीत यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.), जिल्हा परिषद रत्नागिरी श्री. शेखर सावंत, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी श्री. डॉ. अनिरुद्ध आठल्ये, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद रत्नागिरी श्रीम. सुवर्णा सावंत, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा प्रशिक्षण केंद्र श्री.डॉ.एम.एम. सुर्यवंशी तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या योग दिनाला योग प्रशिक्षक श्री. नरेंद्र गावंड आदिंची प्रमुख उपस्थिती होती. या योगदिनानिमित्त योग प्रशिक्षक यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आरोग्य आणि शरिरासाठी योगाचे महत्त्व सांगून विविध योगासनांचे प्रकार यावेळी घेण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:09 AM 22-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here