चाकरमान्यांना मुंबईतून समुद्रमार्गे गुहागरात आणणाऱ्या बोट मालकांवर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी: देश लॉक डाऊन असताना व जिल्ह्याच्या सीमा बंद असतांना समुद्रमार्गे मुंबईतून चाकरमान्यांना घेऊन येणाऱ्या बोट मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी दिली आहे. या काळात नागरिकांनी स्थलांतर केल्यास संक्रमणाचा धोका वाढतो व प्रशासकीय यंत्रणेवरील ताण देखील वाढतो त्यामुळे अशा गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. काल रत्नागिरी खबरदारने याबाबत सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध केले होते. काहींनी या वृत्ताबाबत साशंकता निर्माण केली होती. मात्र आता आपत्ती व्यवस्थापन कायदा उल्लंघन, मेरीटाईम बोर्ड कायदा उल्लंघन, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेला कायदा उल्लंघन या कलमांतर्गत गुहागर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
05:41 PM 26/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here