शीळ सांडव्यालगतची भिंत कोसळली

0

रत्नागिरी :  तालुक्यातील मिरजोळे येथे जमीन खचण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वारंवार घडत आहेत. रविवारी मध्यरात्री या भागात पुन्हा भूस्खलन होऊन जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले आहे. तर रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या शीळ धरणाच्या सांडव्यालगतची सुमारे 70 मीटर लांब संरक्षण भिंत कालव्यात कोसळली आहे. सोमवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली. शीळ धरणाच्या सांडव्याकडील बाजूला गेल्या काही दिवसांपासून छोट्या-छोट्या भेगा जात असल्याचे ग्रामस्थांकडून चर्चिले जात होते. सध्या शीळ धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यावरून पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहे. मुख्य धरणाला लागूनच सांडवा असून त्याच्या डाव्या बाजूला असणार्‍या डोंगरामध्ये ही धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे. सांडव्यापासून शीळ गावच्या दिशेने संरक्षक भिंत बांधलेली आहे. यातील सुमारे 70 मीटरची संरक्षक भिंत सांडव्याच्या कालव्यात कोसळली. याठिकाणी मोठ्याप्रमाणात भूस्खलन झाल्याने त्याचा  दाब या भिंतीवर आल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरु आहे. तालुक्यातील मिरजोळे येथे जमीन खचण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वारंवार घडत आहेत. रविवारी मध्यरात्री या भागात पुन्हा भूस्खलन होऊन जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार उदय सामंत यांनी रविवारी मिरजोळे येथे भेट देऊन जमिनीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here