मिरजोळेतील गावठी हातभट्टीवर कारवाई, ८७ हजारांची दारू हस्तगत

0

रत्नागिरी : रत्नागिरीत हातभट्टीविरोधात ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत ८७ हजार ६५० रुपये किंमतीची ४८ लिटर हातभट्टीची दारू हस्तगत केली आहे. या कारवाईत तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सकाळी ७ वाजता ग्रामीण पोलिसांनी केली आहे.

IMG-20220514-WA0009

शहरानजीकच्या मिरजोळे परिसरात अवैध हातभट्टी विरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ग्रामीण पोलिसांचे एक पथक मिरजोळे परिसरात दाखल झाले. या ठिकाणी त्यांनी हातभट्टीवर धाड टाकून कारवाईमध्ये ३६०० लिटर गुळ नवसागर मिश्रीत रसायन व साहित्य असा ७२,००० हजार रुपये किंमतीचा माल नाश करण्यात आला. तसेच ४८ लिटर गावठी हातभट्टीची दारु व दारु गाळण्याचे साहित्य तसेच तीन मोटार सायकल असा ८७,६५० रुपये किंमतीच मुद्देमाल जप्त केला आहे.

या करवाईत अमोल सुधाकर पाटील, सुनिल भाई पाटील, संतोष अशोक सकपाळ (सर्व रा . मिरजोळे , पाटीलवाडी) यांचे विरुध्द रत्नागिरी शहर पोलीस पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामिण पोलीस स्थानकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांचेसह, सपोनि शेळके, पोना पावसकर, पोहवा. कदम, पोहवा. गायकवाड, वाझे, पोकों शिंदे व कांबळे यांनी केलेली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:03 PM 23-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here