मुंबई : सध्याची राजकीय परिस्थीती अस्थिर आहे. अश्यात नेमकी कोणती शिवसेना खरी, असा प्र्श्न उपस्थित झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी आमचा गट म्हणजेच खरी शिवसेना असा दावा केलाय.
त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. यातच अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी एक ट्विट केलं आहे. ‘एकनाथ शिंदेंनी मला शिवसेनेत आणलं, उद्धव ठाकरेंनी मला शिकवण दिली’, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?, असं ट्विट दिपाली सय्यद यांनी केलं आहे.
‘सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरेसाहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू’, असं ट्विट दिपाली सय्यद यांनी केलंय.
कालही दिपाली सय्यद यांनी एक ट्विट केलं होत. ‘माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या वनवासात कायम राहील. शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे. आपले मत शिवसेनेला कायम राहील. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल’, असं त्या म्हणाल्या होत्या.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:33 PM 23-Jun-22
