जीवनावश्यक मालवाहतुकीस परवाना देण्याची सुविधा उपलब्ध

0

कोरोना संसर्ग संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक, महत्त्वाच्या व नाशवंत मालवाहतूकीस परवाना देण्याची सुविधा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. परिवहन कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी वाहतुकदारांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये mh08@mahatranscom. in या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवावा. अर्जाची शहानिशा करुन अशा अर्जदारांना परवान्याच्या स्कॅन कॉपी ई-मेलद्वारे पाठविण्यात येतील, मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 25.03.2020 अन्वये सुधारित अधिसूचना पारित केली आहे. या अधिसूचनेतील अनुक्रमांक 3 ,9व22 वाचावे .अनु कृ (9) अन्वये सर्व वाहतुक सेवा (हवाई/लोहमार्ग/रस्ते) स्थगित केल्या आहेत. तथापि त्यामधून (अ) जीवनावश्यक, महत्त्वाच्या व आवश्यक मालवाहतूकीस व (ब) अग्निशमन, कायदा-सुव्यवस्था व आणीबाणीच्या सेवा या वाहतुकीस सूट जाहीर केलेली आहे. सदर निर्बंध माणसांच्या हालचालीवर असून अत्यावश्यक व महत्त्वाच्या मालवाहतूकीवर नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या अधिसूचनेतील अ. क्र. (22) नुसार अत्यावश्यक सेवा पुरविणा-या आस्थापनांनी अशा मालवाहतुक करणा-या वाहनांवर तसेच त्यांच्या कर्मचा-यांची ने-आण करणा-या वाहनांवर स्वत: स्टीकर्स बसवावेत. सदर स्टीकरवर वाहतुकीच्या उद्देशाचा मजकूर स्पष्ट दिसेल अशा पध्दतीने प्रदर्शित करावा. जेणेकरुन अंमलबजावणी यंत्रणेच्या सहज निदर्शनास येईल. अशी सुविधा पोलिस विभाग, प्रत्येक तालुका येथे तहसीलदार ,बी डी ओ आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याकडूनही देण्यात येणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here