जनतेने शासनाच्या आदेशांचे पालन करावे – शरद पवार

0

राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या फेसबुक लाईव द्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी पवारांनी जनतेला शासनाच्या आदेशांचे पालन करावे असे आवाहन केले. आज देशावर सगळ्यात मोठे संकट आले आहे. याचे परिमाण दीर्घकालीन असणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एकत्र येऊन काम केले पाहिजे. कोरोनाचे परिणाम हे देशाच्या आर्थिक क्षेत्रावर, सामाजिक क्षेत्रावर आणि मानवाच्या मानसिकतेवर होणार आहे. तसेच पशु पक्षी , शेती उत्पन्न या सर्व घटकांना याचा फटका सहन करावा लागणार आहे. पिक कर्जाची परतफेड शक्य नाही. त्यामुळे सरकारने शेतीच्या दृष्टीने प्रभावी पाऊल उचलावी. यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एकत्र येऊन काम केल पाहिजे. राष्ट्रवादीचे आमदार खासदार १ महिन्याचे वेतन देणार, असे पवार म्हणाले. तसेच सरकारने धान्य मोफत देताना शेतमाल खरेदी बाबत विचार करावा. असेही पवार म्हणाले. पोलीस आणि आरोग्य यंत्रणांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ते आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. शिस्त येण्यासाठी पोलिसांना कठोर व्हावे लागले. मात्र काही ठिकाणी पोलिसांनीही सामंजस्य दाखवावे, असे आवाहन शरद पवारांनी केले.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:51 AM 27-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here