जिल्ह्यात पावसाचा जोर 9 ऑगस्टपर्यंत कायम

0

रत्नागिरी : सोमवारी रात्री जोरदार वार्‍यासह पावसाने त्या आधीच्या दोन दिवसांप्रमाणेच झोडपल्याने जिल्ह्यातील पूरस्थिती कायम राहिली. पावसाचा हा जोर 9 ऑगस्टपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने दिला असून त्यानुसार प्रशासनाने किनारी भागासह दुर्गम आणि डोंगरी भागांत सावधगिरी बाळगण्याच्या सूचना करताना  अ‍ॅलर्ट  जारी केला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत झालेल्या पडझडीत सुुमारे साडेतेरा लाखांची हानी झाली. जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाने झोडपून काढले. सोमवारी मात्र पावसाचा जोर काही अंशी कमी राहिला. पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला राहिला. खेड तालुक्यात जगबुडी नदीने धोका पातळी गाठल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तर सोमवारी दिवसभर कोकण रेल्वमार्गावरील वाहतूकही बाधित झाली होती. जिल्हा नियंत्रण कक्षात नोंदविलेल्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील अनेक भागांत झालेल्या पडझडीत सुुमारे साडेतेरा लाखांची हानी झाली. सोमवारी शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. जिल्हा नियंत्रण कक्षातील नुकसानीच्या नोंदीनुसार, दापोली तालुक्यात 15 घरांचे सुमारे साडेसात लाखाची हानी झाली. खेड तालुक्यात जगबुडी नदीने धोका पातळी गाठल्याने महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. खेड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने सहा घरांचे सुमारे 50 हजाराची हानी झाली. चिपळूण तालुक्यात वाशिष्ठी नदीचा जलस्तर धोकादायक स्थितीत वाढल्याने  या मार्गावरील वाहतूक बाधीत झाली. चिपळूण तालुक्यातही पूरस्थिती उद्भवल्याने अनेक घरांना धोका निर्माण झाला असून विविध भागात सहा घरे आणि एका गोठ्याचे सुमारे दोनलाख 45 हजाराची हानी झाली. संगमेश्वर तालुक्याच्या दुर्गम भागात अनेक गावात पूरस्थती निर्माण झाली.  त्यामुळे देवरुख सह अन्य गावांचा सपंर्क दिवसभर खंडीत झाला. तालुक्यात मुसळधार पावसाने सुमोर सव्वा लाखाची हानी झाली.  रत्नागिरी तालुक्यातही हरचेरी ,चांदेराई,  टेंभ्ये आणि सोमेश्‍वर भागत पाणी साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. या भागात अनेक घरे पाण्याखाली गेली होती. सोमवारी  दुपारपर्यंत येथील एसटी वाहतुक बंद ठेवण्यात आली होती. तालुक्यातील काजळी नदीच्या जलस्तरात वाढ झाल्याने येथील काजरघाटी, पोमेंडी, गावांना धोका निर्माण झाला. लांजा तालुक्यातही मुसळधार पावसाने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. तालुक्यातील खोरनिनिको धऱणाचा ओव्हरफ्लोमध्ये वाढ झाल्याने येथे पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला. राजापूर तालुक्यातही गेले दोन दिवस पावसाने जनजीवन विस्कळीत केले होते. बाजारपेठ आणि जवाहर चौक भागात पाणी साचल्याने  येथील भागा पाण्याखाली गोला होता. अनेक दुकानात पाणी शिरल्याने व्यापार्‍यांची हानी झाली. तर ग्रामीण भागासह शहरी भागात झालेल्या  घरांच्या पडझडीत सुमारे एक लाख 36 हजाराचे नुकसान झाले. दरम्यान 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या कालवधीत दक्षिण कोकणात काही भागात मुसळधार तर काही भागात अतीमुसळधार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्रतविली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here